लाडक्या व्हॉट्स अॅपला करावा लागू शकतो कायमचा बाय-बाय !

whatsapp company can stop business india due to new rules in india
whatsapp company can stop business india due to new rules in india

नवी दिल्ली : व्हॉट्स अॅप हे सध्या भारतात इतके लोकप्रिय झाले आहे की, काही जणांच्या दिवसाची सुरवातही हे अॅप पाहिल्याशिवय होत नाही. पण व्हॉट्स अॅपचे भारतातील अस्तित्त्व धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफार्मसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रस्तावित नियम आहेत. नियमांच्या अंतर्गत सोशल मिडीया सेवांचा दुरूपयोग आणि हिंसा पसरवणाऱ्यांपासून रोखण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागेल. भारतात कार्यरत सोशल मिडीया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हॉट्स अॅपचे अस्तित्त्व धोक्यात येऊ शकते. भारतात सध्या या अॅप युजर्सची संख्या 20 कोटी आहे. व्हॉट्स अॅप कम्युनिकेशन प्रमुख कार्ल वूग यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्स अॅपच्या प्रस्तावित नियमांमध्ये मेसेजेस् चा शोध घेणे ही मुख्य समस्या आहे. तसेच, स्त्रोताचा उगम शोधण्यावर भर देण्याबाबत प्रस्तावित नियमांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 

'मूलभूतरित्या हे अॅप एंड-टू-एंड एनक्रिप्शन करते. म्हणजे मॅसेज पाठवणारा आणि प्राप्त करणारा हे दोघेच मॅसेज वाचू शकतात. व्हॉट्स अॅप कंपनीलाही ते मॅसेज वाचता येत नाही. पण जगभरातील युजर्सना जी गोपनीयता पाहीजे आहे, ती प्रस्तावित बदलाला अनुरुप नाही. व्हॉट्स अॅप हे एंड-टू-एंड एनक्रिप्शन पुरविते. पण नवीन नियमानुसार व्हॉट्स अॅपमध्ये बदल करावे लागणार अशा स्थितीत मेसेज सेवा आपल्या सध्याच्या रुपात देता येणार नाही,' असे कार्ल वूग सांगितले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com